गांडूळखत प्रशिक्षण व गांडूळ खत बेड वाटप

0
1542

मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली व वाहनचालक संघटना डॉ. .बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ दापोली आणि श्री. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लोटे (एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड) यांच्या संयुक्त विद्यमाने गांडूळखत प्रशिक्षण व गांडूळखत बेड वाटप हा कार्यक्रम कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाला डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ.श्री. संजय भावे, डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली कुलसचिव डॉ. श्री. प्रमोद सावंत. तसेच श्री. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लोटे ( एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड ) चे संचालक मा.श्री. सुरेश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्री. प्रवीण झगडे यांनी केले तर डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली चे वाहनचालक संघटना अध्यक्ष श्री. राकेश विचारे यांनी प्रास्ताविक केले.तसेच प्रमुख मान्यवरांनी आपले विचार मांडले. काही शेतकरी प्रतिनिधींनीआपलें अनुभव सांगितले व या संघटने प्रति आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमात डॉ. श्री. राजेश धोपावकर यांनी गांडूळखत कसे बनवावे याचे उपस्थित शेतकऱ्यांना प्रेज़न्टेशनद्वारे मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना अल्पदराने श्री. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लोटे (एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड ) यांच्या कडून गांडूळखत बेडचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष श्री राकेश विचारे, . उपाध्यक्ष श्री. मिलिंद बालगुडे, सेक्रेटरी श्री. संजय पवार, उपसेक्रेटरी श्री. संजय वायंगणकर, खजिनदार श्री. सुरेश जाधव, तसेच सदस्य श्री. सुनील हेलगावंकर, श्री. संजीवन पाटोळे, श्री. शशिकांत राजेशिर्के, श्री. आप्पा पोसकर, श्री. रमण झगडे, श्री. सचिन शिगवण, श्री. बजरंग तणमोर, श्री. वैभव साळुंखे यांनी पार पाडली.

गांडूळखत बनविण्यासाठीची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील PPT वर क्लिक करा . – Gandulkhat Infomation Vermicompost Dapoli

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here