उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव स्पंदन आणि बळीराजा गटामार्फत शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दापोली तालुक्यातील कुडावळे येथे ‘भाकरी महोत्सव’ घेण्यात आला. १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला डॉ.बा.सा.को.कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ.संजय सावंत, संचालक विस्तार शिक्षण डॉ.संजय भावे, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ.दीपक हार्डीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ.उत्तम महाडकर, उन्नत भारतचे नोडल ऑफिसर डॉ.संतोष वरवडेकर आणि ग्रामसमन्वयक विनायक महाजन उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रमुख अन्न भाकरी आहे.
कोकणात केल्या जाणाऱ्या नाचणी, तांदूळ, वरी, कणकुटाच्या भाकऱ्या या महोत्सवात होत्या. त्यासोबतच भाकरी सोबत खाल्ले जाणारे पदार्थ झुणका, तीळकुट, ठेचा, चटणी, दही, वांग्याची-कारल्याची भाजी शिवाय घावणे, पानोडे, पातोळी, वाटली डाळ आदी पदार्थ तयार केलेले होते. ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठाचे कादिवली आणि कुडावळे गावात राहणाऱ्या स्पंदन आणि बळीराजा विद्यार्थी गटामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ढोबळे आणि संतोष वरवडेकर सरांनी केले. शोभा ताईंनी डॉ.बा.सा.कॉ.कृ.विद्यापीठावर सुंदर कविता सादर करीत कुलगुरू व इतर मान्यवरांचे गावातर्फे स्वागत केले.
कुलगुरूंनी कुडावळे गावास ही माझी तिसरी भेट आहे सांगत कुडावळे गावच्या शेतकऱ्यांना आणि सर्व लोकांना ग्रामीण संस्कृती टिकवण्याबद्दल आणि विद्यापीठाला कायम सहयोग देत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि आभार मानले. कुलगुरू, सर्व मान्यवर व स्पंदन गटातील विद्यार्थी अविनाश ढोबळे, संतोष घुमरे, नानासाहेब साळुंके, राजेश सारूक, महेश नागरगोजे, त्रिंबकसिंह घुसिंगे, भरत चौधरी, विश्वजीत चौधरी, विकास हागारे आणि बळीराजा गटातील किशोर रूपन्नवार, रोहित विशे, दिपक ढोक, कृष्णा गाढवे, शुभम गायकवाड, पराग पाटील, वैभव घाडी, प्रथमेश सुपे, राकेश ठोंबरे, हर्षल गुढे यांनी गावतल्या लोकांसोबत दुपारचे सहभोजन केले आणि महोत्सवाची सांगता झाली.