दापोलीत कुक्कुट पालन प्रशिक्षण

2
3668

दापोली तालुक्यात अंडी व मांस यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्यामानाने तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून याची पूर्तता होत नाही. परिणामी अंडी व मांसासाठी कोंबडयांची खरेदी सातारा, सांगली,कोल्हापूर यांसारख्या बाहेरी जिल्ह्यातून केली जाते. अंडी व मांस याची वाढती मागणी पाहता दापोली तालुक्यातच शेतकरी तयार व्हावे व ते आर्थिक दृष्ट्या सबळ व्हावे तसेच, अंडी व मांसासाठी वाढणाऱ्या मागणीची पूर्तता येथेच व्हावी या उद्देशाने डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व उन्नत भारत अभियान यांचे संयुक्तः विद्यमाने दि. ११ ते १६ मार्च २०१९ या सहा दिवसाच्या कालावधीसाठी व्यावसायिक कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणाच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी उन्नत भारत अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. संतोष वरवडकेर व ग्रामसमन्वयक श्री. विनायक महाजन यांनी सांभाळली. प्रशिक्षणास तालुक्यातील विविध गावांतून जवळपास ४० ते ५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ असा प्रशिक्षणाचा दिनक्रम होता.दि. १३ ते १४ मार्च २०१९ या कालावधीत व्यावसायिक कुकुट पालन हे प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खालील मान्यवरांचे सहकार्य लाभले.

१) डॉ. नेहा जोशी (प्रमुख मार्गदर्शक) – विषय -कोंबडयांच्या जाती, रोग, लसीकरण,पक्षी गृहाची उभारणी रचना व व्यवस्थापन इ.बाबत माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक म्हणून कोंकण कृषी विद्यापीठातील पक्षी गृहास भेट देऊन कुकुट पालन व्यवसाय व्यवस्थापन संदर्भात प्रशिक्षणार्थीना माहिती देण्यात आली.
२) डॉ.लोंढे (पशुधन विकास अधिकारी ) यांनी कोकणातील कुक्कुट व्यवसाय संधी आणि समस्या या बाबत शिक्षणार्थीना माहिती दिली.

३) बँक ऑफ महाराष्ट्राचे मनोज मो .पाटील (शाखा व्यवस्थापक) – यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी कृषी कर्ज प्रकरणे कशी करावी, किती रक्कमे पर्यंत कृषी कर्ज मिळू शकते , कृषी कर्जाबाबत असणाऱ्या सवलती तसेच, विमा उतरविणे या बाबत माहिती दिली.

४) डॉ .नरेंद्र प्रसादे (कोंकण कृषी विद्यापीठ दापोली) – कुकुट पालन व्यवसायात कोंबडयांचे खाद्य हा महत्वाचा घटक असतो. दापोलीत खाद्य बाहेरून येत असल्याने येथील शेतकऱ्यांना ते न परवडण्याजोगे ठरते त्यामुळे उपलब्ध प्रथिने व इतर घटकांचा वापर करून खाद्य येथेच कसे तयार करता येईल या बाबत मार्गदर्शन केले तसेच खाद्यातील घटक व त्यांच्या खाद्यात असणारे प्रमाण व फायदे या बाबत डॉ. प्रसादे सर यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

५ )डॉ.प्रशांत जाधव सर (कृषी विज्ञान केंद्र देवधे ,लांजा)- कर्जासाठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा , लसीकरण , परसातील कुक्कुट पालन तसेच, ग्रामीण भागातील स्त्रिया हा व्यवसाय चांगल्या प्रकारे कसा करू शकतात या बाबत विविध उदाहरणे देऊन प्रशिक्षणार्थीना माहिती सांगितली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थीकडून लेखी व मौखिक स्वरुपात व्यावसायिक कुक्कुट पालन व्यवसाय व प्रशिक्षण या बाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या.

अनेक प्रशिक्षणार्थीनी लवकरच व्यवसाय सुरु करण्याची मानसिकता दर्शविली व प्रशिक्षण आयोजित केल्या बद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. शवेटी प्रशिक्षणार्थीना प्रमाण पत्र वाटप करून माणसाने माणसाशी माणसासम वागणे या गीताने व्यवसायिक कुक्कुट पालन या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

2 COMMENTS

  1. मला गावरान कोंबडी पिल्लू हवे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here