कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण (मसाले) – कादिवली

2
2166

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/०१/२०१९ रोजी कादिवली येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदर प्रशिक्षणासाठी महात्मा गांधी औदिगीकरण संस्था, वर्धा येथून आलेल्या डॉ.अपराजिता वर्धन, डॉ.आदर्शकुमार अग्निहोत्री, डॉ.जयकिशोर छांगाणी, डॉ. सुधा तिवारी यांनी विविध प्रकारचे मसाले बनविण्याचे प्रात्याक्षिके दाखविली. त्यासाठी लागणाऱ्या आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या मसाले पदार्थांपासून चहा मसाला, चिकन मसाला, सांबर मसाला, चाट मसाला इ.मसाले बनवून महिला उद्योजक कसे निर्माण होतील याचेही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नोडल ऑफीसर, उन्नत भारत अभियान – डॉ.संतोष वरवडेकर आणि ग्रामसमन्वयक – श्री विनायक(काका) महाजन यांची प्रमुख उपस्तिथी लाभली. सदर प्रशिक्षणास कादिवली गावचे संपर्कसहयोगी-शिरीष चव्हाण, सरपंच-रविंद्र मांडवकर, उपसरपंच- संजय घाग तसेच मोठ्या संख्येने महिला बचत प्रतिनिधी व महिलांची उपस्तिथी होती.

 

2 COMMENTS

  1. तालुका दापोली एक अतिशय स्तुत्य उपक्रम.
    हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply to तालुका दापोली Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here