वाढत्या शहरीकरणामुळे मैदाने कमी होत चालली आहेत आणि मैदानी खेळ नसल्यामुळे मुलांचा मोबाईल वापर वाढत आहे. सध्याच्या पिढीचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सुदृढ करायचे असेल तर मुलांना जुन्या, पारंपारिक खेळांकडे परत नेलं पाहिजे. असं मत बाळगून दापोलीतील खेर्डी गावात राहणारे ‘श्री. मिलिंद खानविलकर’ गेली ५ वर्षे आपल्या राहत्या घरी ‘हरवलेले बालपण’ नावाचे शिबिर चालवीत आहेत. या शिबिरात ते मुलांकडून कोणकोणते खेळ खेळून घेतात, हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ वर क्लिक करा.
Recent Articles
ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ
दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...