दापोलीतील हर्णे येथील ‘सुवर्णदुर्ग’ या जलदुर्गाचे सहाय्यक दुर्ग म्हणून कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला, असे तीन उपदुर्ग आहेत. त्यातील हर्णे बंदराला लागूनच असलेला किल्ला म्हणजे कनकदुर्ग. हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. याचे क्षेत्रफळ साधारणत: पाव हेक्टर आहे. किल्लाचा आकार लाबंट आणि किल्लावर जाण्यास पायऱ्या आहेत. त्या जेथे संपतात तेथे उजव्या हातास खालच्या सपाटीवर पाण्याची टाकी दिसते. किल्लाच्या आत उंच जागी दक्षिण दिशेस दिपग्रह आहे. तेथेच हवामान खात्याचे कार्यालय आहे. किल्लाच्या आत एक बाजूस सलग नऊ छोटे छोटे पाण्याचे हौद दिसतात. किल्लाच्या पश्चिम व दक्षिण बाजूस समुद्रसपाटीच्या पातळीवर खडक दिसतो. या खडकावर समुद्राच्या लाटा जोरजोराने आदळत असतात. सायंकाळच्या वेळेस अनेक पर्यटक व ग्रामस्थ या किल्ल्यावर येतात. किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे आणि समुद्राचे अगदी नयनरम्य सुंदर असे दर्शन होते. हर्णे बंदरातील कोळ्यांच्या होड्या, बंदरावरचा मासळी बाजार अगदी उत्तम प्रकारे येथून पाहता येतो. त्यामुळे हर्णे बंदरावर आलेला पर्यटक कनकदुर्गावर गेल्याशिवाय राहत नाही.
गोवा किल्ल्याची माहिती – https://talukadapoli.com/places/goa-fort-harnai/
हर्णे मासळी बाजाराची माहिती – https://talukadapoli.com/places/harnai-bunder-fish-auction/
सुवर्णदुर्गाची माहिती- https://talukadapoli.com/places/harnai-suvarnadurg/