दापोली तालुक्यातील तीन जुन्या चर्चपैकी सर्वात जुने चर्च म्हणजे हर्णे येथील ‘सेंट अॅने चर्च’. हे साधारणता ३०० वर्ष जुने आहे. याच्या स्थापानेचे निश्चित पुरावे नाहीत; परुंतु काहीच्या मते मराठा- पेशवा राजवतीट सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या डागडूजीसाठी गोव्याहून जे पोर्तुगीज इंजिनीयर्स आले त्यांनी हे चर्च बांधले.
तर काहींच्या मते गोवा, फत्तेगड व कनकदुर्ग या किल्ल्याची उभारणी शाहू महाराजांनी करायचे ठरविले तेव्हा गोव्याहून जे पोर्तुगीज इजिनिअर्स बोलावले, त्यानी हे चर्च बांधले. या चर्चचा उल्लेख पूर्वी फिरंगी चर्च म्हणून केला जायचा. परंतु saint anne by the sea charch अशी चर्चच्या नावाची जुनी नोंद आहे. येशूची आई माता मेरी व माता मरेची आई सेंट अने म्हणून चर्चेचे नाव ‘सेंट अॅने’ ठेवणयात आले आहे. हे catholic पंथीयाचे प्रार्थनास्थळ आहे. चर्चच्या लगतच धर्मगुरूचे घर बांधण्यात आले आहे. २० आक्टोबर १९५३ पासून पुण्याच्या मुख्य धर्मोपदेशकांच्या व्यवस्थापनेखाली रत्नागिरी जिल्ह्यातील चर्चचा समावेश करण्यात आला, तेव्हा हर्णे येथे धार्मिक कार्यासाठी रत्नागिरी येथील धर्मगुरू येत असत. परंतु सन १९९६ पासून हर्णे येथे रीतसर निवासी धर्मगुरू (RESIDENT PRIEST ) ची नेमणूक करण्यात आली. नंतर त्यांना चर्चेचे मुख्याधिकार देण्यात आले. सध्या फादर बेनीटो फर्नाडीस हे चर्चचे मुख्य धर्मगुरू आहेत.
दापोली तालुक्यात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या इतर धर्मियांच्या तुलनेत फार कमी आहे; पण पर्यटक म्हणून येणारे ख्रिस्ती बांधव या चर्चला जरूर भेट देतात.