याकुब बाबा दर्गा

0
3617

हा दापोली तालुक्यातील केळशी येथील प्रसिद्ध असा ‘याकुब बाबांचा दर्गा’. हा दर्गा केळशी किनारपट्टीपासून जवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. हा दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, असे सांगितले जाते. तर काही लोक शिवाजी महाराजांनी दर्ग्याचे काम सुरु केले व नंतर ते संभाजी राजांनी पूर्ण केले, असे सांगतात.

‘याकुब बाबा’ हे शिवाजी महाराजाचे गुरु होते. दाभोळ स्वारीस निघाले असताना महाराजांना याकुब बाबांची कीर्ती कानावर आली, ते बाबांच्या दर्शनसाठी आले; तेव्हा महाराजांना बाबांकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले. दाभोळ स्वारी फत्ते झाली.

याकुब बाबा हे सिंध प्रांताकडून बाणकोट मार्गे केळशीला आलेले, असे सांगितले जाते. त्यांच्यासोबत एक दहा वर्षाचा सोहील खान नामक मुलगा होता, जो पुढे हिम्मत खान या नावाने ओळखला जाऊ लागला. याकुब बाबांच्या दर्ग्या शेजारीच हिम्मत खान यांचा दर्गा आहे. उरुसाच्या वेळी प्रथम चादर या दर्ग्यावर चढवली जाते आणि उरुसाला सुरुवात होते. हा उरुस उर्दू तारखेप्रमाणे शहाशाबानला असतो. या ऊरुसाला मुस्लिम आणि हिंदू भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. ‘चिंचवळ’ गावच्या हिंदू भाविकांकडून दरवर्षी उरुसाच्या आधी दर्ग्यावर नेवेद्य येतो. या दर्ग्याला आता ३३८ वर्ष पूर्ण झाली आहेत दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर फारशी भाषेत एक संदेश कोरलेला आहे; जो आजपर्यंत कोणालाही वाचता आलेला नाही. दर्ग्यातून समुद्राचे आणि नारळी पोफळीच्या बागाचे विहंगम दृश दिसते. या दर्ग्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात आणि हे पर्यटकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here