नकटा नृत्य
[youtube https://www.youtube.com/watch?v=CrXE5xFdmEk]
कोकणातील एक लोकनृत्य.
या नृत्यात तीन सोंगे असतात. कोळी, कोळीण व नकटा.
नकटा हा मुख्य असतो.
कट्याचा पोशाख व मुखवटा भीतीप्रद असतो.
...
नौका पूजन
चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण जर कुठे दुमदुमतो, तर तो फक्त कोकणात. कोकणातला शिमगा म्हणजे निव्वळ होलिकादहन नव्हे तर देवाधिकांचे मानपान, पालख्या,...
फाल्गुनोत्सव व होळी
फाल्गुनोत्सव व होळी
फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृष्णाप्रीत्यर्थ या महिन्यात गाई, तांदूळ व वस्त्रे यांची...
गोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार
परशुरामाने बेटासुर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर तोडले. त्या शिराच्या ब्रम्हरंध्रात त्याच्याच शिरांचे तंतू ओवले आणि ते खांद्यावर घेऊन ‘तिंतृण-तिंतृण’ असा ध्वनी काढीत...
काटखेळ
दापोली तालुक्यातील खेर्डी या गावात तेथील ग्रामदैवत ‘श्री चंडिकादेवी’ हिच्याशी जोडलेला एक आगळावेगळा लोककला प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे ‘काटखेळ’. हा काटखेळ प्रामुख्याने शिमग्यात खेळला जातो. देवीची पालखी देवळातून निघून पुन्हा देवळात येईपर्यंत जिथे-जिथे थांबेल, तिथे-तिथे हा काटखेळ सादर होतो. या काटखेळाचा इतिहास असा सांगितला जातो की, ‘श्री चंडिका’ देवीचा हा काटखेळ शिवकालपूर्व आहे. शिवकाळात मराठी मावळे या काटखेळाद्वारे गुप्त संदेश एकमेकांपर्यंत पोहचवित असत. काटखेळींच्या नृत्यात आणि गाण्यात सांकेतिक शब्द व सांकेतिक खुणा असत, त्यातून हा व्यवहार चाले.