दापोलीचा ऑनलाईन शिमगोत्सव

1
1582

  नमस्कार कोकणकर! नमस्कार दापोलीकर!!

काय मग मंडळी आता यंदाचा आपला  शिमगोत्सव अगदी तोंडावर आलाय ना… शिमगोत्सव म्हटला की प्रत्येक दापोलीकर एका वेगळ्याच उत्साहाने फुलून जातो. गणेशोत्सव काय किंवा शिमगोत्सव काय… प्रत्येक दापोलीकराच्या काळजातले सण. शिमगोत्सवात आपल्या ग्रामदैवतांच्या पालखीला, भेटीला गावी आला नाही असा दापोलीकर विरळाच नाही का?

पण मंडळी, गेल्यावर्षीचा शिमगोत्सव आपण उत्साहात साजरा केला, पण त्यानंतरचे संपूर्ण वर्ष कोरोना महामारीच्या काळ्या गडद छायेतच गेले आहे.  हा कोरोना नावाचा राक्षस कसा कुठून आला काय माहीत, पण त्याने भारतासह संपूर्ण जगास जणू वेठीस धरले आहे. या आजाराचा सामना करायचा तर प्रत्यक्ष युद्धात न उतरता घरातच थांबून, योग्य ती स्वच्छतेची काळजी घेऊन, दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवून , तोंडावर मास्क लावून या शत्रुशी लढता यावे यासाठी सरकारने नागरिकांसाठी अतिशय कडक कायदे व निर्बंध लागू केले आहेत. अगदी आतादेखील हे सारे निर्बंध तसेच लागू आहेत. आता तर खास कोकणातील शिमगोत्सवासाठी सरकारने काही कडक निर्बंध व अटी घातल्या आहेत. या नियमांच्या अधिन राहूनच कोकणवासियांना आपला पारंपारिक लोकप्रिय शिमगोत्सव साजरा करायचा आहे.

यंदाच्या पारंपारिक शिमगोत्सवात आपले मुंबईकर बांधव प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नसले तरीही अशा चाकरमान्यांची श्रद्धा व भावना पाहून तमाम दापोलीकरांना ‘ डिजिटल ‘ रुपात शिमगोत्सवाचा आनंद व समाधान देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून दापोलीच्या कला, संस्कृती व इतिहास या विषयांसाठी वाहून घेतलेल्या आमच्या  www.talukadapoli.com या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

आम्ही  www.talukadapoli.com  व दापोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमातून तमाम दापोलीकरांना यंदाच्या शिमगोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

       

आमच्या  www.talukadapoli.com माध्यमातून आपणास यंदाचा नवा कोरा शिमगोत्सव अगदी घरबसल्या पाहता येईल. हा शिमगोत्सव डिजिटल स्वरुपात असला तरीही तो आपणा सर्वांना प्रत्यक्ष…. अगदी डोळ्यांसमोर पाहिल्याचा अनुभव मिळेल याची संपूर्ण खबरदारी आम्ही  www.talukadapoli.com घेणार आहोत.

आमच्या  www.talukadapoli.com च्या माध्यमातून तमाम दापोलीकरांना पारंपारिक पण डिजिटल शिमगोत्सवाचा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आपण आपल्या गावातल्या शिमगोत्सवाचे पारंपरिक व वैशिष्टय़पूर्ण व्हिडीओज आमच्याकडे पाठवायचे आहेत. लवकरात लवकर प्राप्त होणाऱ्या व्हिडीओज आमच्या  www.talukadapoli.com   च्या माध्यमातून प्रसारीत केले जातील.

हे व्हिडिओ करताना खालील अटींचे पालन  आवश्यक आहे

  1. व्हिडीओ जास्तीत जास्त तीन मिनिटांचाच असावा. मात्र असे कितीही व्हिडिओज आपण पाठवू शकता.
  2. व्हिडिओ शूट करताना मोबाईल कॅमेरा किंवा डिजिटल कॅमेरा1920×1080 याच resolution मध्ये सेट करावा.
  3. व्हिडिओ करण्याआधी संबंधित ठिकाणी शासनाने जारी केलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन दिसावे. जसे की, तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग वगैरे.
  4. व्हिडिओ करताना मोबाईल आडवा धरलेला असावा.
  5. व्हिडिओ करताना मोबाईल कॅमेरा उत्तम दर्जाचा असावा जेणेकरून चित्रण उत्तम दर्जाचे होईल.
  6. रात्रीच्या वेळेस व्हिडिओ करताना फ्लॅशलाईट ऑन करून किंवा योग्य लाईटस् चा वापर करुन व्हिडिओ करावा.
  7. व्हिडिओ करताना मोबाईल हलवू नये.
  8. 8. वरील अटींची पूर्तता करणारे व्हिडिओ त्वरित पाठविण्यासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करावा-
  • दिपक सूर्यवंशी – 9637904453
  • विशाल बोरघरे– 9673959333

तर वाट कसली बघताय… आजच आपले व्हिडिओ आमच्याकडे पाठवून द्या. तुमच्या सोबतच तमाम दापोलीकरांना यंदाच्या वैशिष्टय़पूर्ण शिमगोत्सवाचा आनंद वाटूया… द्विगुणित करुया.

चला तर मग, आमच्या  www.talukadapoli.com च्या Facebook, Instagram, YouTube व दापोली पोलीस स्टेशनच्या सहकार्यातून यंदाच्या  शिमगोत्सवाचा आस्वाद घेऊया.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here