दापोली चर्च

0
3078

कॅम्प दापोलीच्या इतिहासातला इंग्रजांनी बांधलेल्या सर्वात जुन्या वास्तुंपैकी एक म्हणजे कॅम्पच्या मध्यावर असलेला हा चर्च. १८१८-१८५७ च्या काळात स्थायिक असलेल्या इथल्या इंग्रजी अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थनेकरिता ही इमारत बांधली गेली. चर्चची ही इमारत गॉर्थिक शैलीत बांधण्यात आली आणि चिऱ्याने बांधलेली ही इमारत अतिशय देखणी होती. चर्चच्या उंच मनोऱ्यावर एक ६ फुटाची मोठी घंटा असायची, ती सध्या कुठे आहे याचा शोध घ्यावा लागेल.

चर्चच्या खिडक्या दोन्ही बाजूने लांब व वर टोकाकडे निमुळत्या आहेत, त्यामुळे त्या भाल्याच्या भात्या प्रमाणे वाटतात. या खिडक्यांना इंग्रजी Architecture मध्ये Lancet Windows असं म्हणतात. इंग्लडला, तिथल्या कॅथेड्रल आणि चर्च मध्ये अश्या खिडक्या पाहायला मिळतात. १८१८ पासूनच्या कॅम्पच्या काळात आणि पुढे ब्रिटिश राजवटीत सैन्य दलातले सर्व, म्हणजे जवळजवळ २००० कोकणवासी इथं पेन्शन करिता वर्षातून ४ वेळा जमायचे. त्या काळात या चर्चच्या आवारात SPG मिशनची ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराची व्याख्याने चालायची. चर्चचे आवार व इमारत अजूनही स्कॉटिश मिशनच्या हक्काची आहे असे सांगितले जाते. अगदीच अश्या रचनेचे चर्च पुणे जिल्ह्यात पुरंदर किल्ल्याजवळ आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here